मनासारखे झाले जे जे, तेवढेच मी जपले
घडले काही मनावेगळे, ते काळाने टिपले
मनासारखे घडावेच ही जन्माची अभिलाषा
कुठे जराशी ठेच लागता सलते घोर निराशा
आशा येते, लेप लावते, बघते दुखले-खुपले
करायचे ते कर्म करावे, मिळायचे फळ मिळते
विश्वासाने प्रयत्न करता दैव अकल्पित फळते
जे घडते ते भले-चांगले, मंत्र मनी हे जपले
अमोल मानवजन्म मिळाला, सार्थ कराया झटले
मुक्तपणाने मनासारखे व्यक्त व्हायला शिकले
परमेशाची कृपा अलौकिक, त्या तेजाने दिपले
Tai tumhi nehemich pramanik ani ashayghan lihita.
ReplyDeletePunha ekada kavita khup avadali.
साधी सोपी तरीही खूप काही शिकवून जाणारी ...
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच अप्रतिम ....