जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती
रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती!
मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती
स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती
तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती!
रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!
अधरांच्या उंब-यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!
काय सही आहे गं कविता!! मस्तच!! सॉलीड मूडमधे लिहीली आहेस तू. एकदम झकास.
ReplyDelete