Saturday, May 15, 2010

सजा

उदासी नसे, मौन हे बोलते
खुशाली विचारी मला रोज ते!

दिले सोडुनी मी मनाला, जसे
प्रवाहात कोणी दिवे सोडते

धरेला नकोशी असे काय मी?
खचे ती, जिथे पाय मी रोवते!

अरे चित्रगुप्ता, जरा सांग ना,
कसे पुण्य अन् पाप ते कोणते?

पुराव्यानिशी सिद्ध निष्पाप मी,
न केल्या गुन्ह्याची सजा भोगते!

3 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. दिले सोडुनी मी मनाला, जसे
    प्रवाहात कोणी दिवे सोडते

    धरेला नकोशी असे काय मी?
    खचे ती, जिथे पाय मी रोवते!


    - सुंदर कल्पना.

    मक्त्याची दुसरी ओळ "न केल्या गुन्ह्याची सजा भोगते" ऐवजी 'कुणाच्या गुन्ह्याची सजा भोगते ?' अशी केल्यास शेराचे अवकाश वाढेल असे वाटते. अर्थात हे फक्त माझे मत झाले. कवयित्री म्हणून तुमचा निर्णय आंतिम.

    ReplyDelete
  3. कविता खूप आवडली.

    - नानिवडेकर

    ReplyDelete