Wednesday, May 19, 2010

गोष्टी तुझ्या

हा माझा अनुवादाचा आणखी एक प्रयत्न. अर्थातच अनुवादात बर्‍याच मर्यादा आहेत, काही ठिकाणी तो भावानुवाद न होता केवळ शब्दशः अनुवाद झाला आहे, मूळ काव्यातल्या कल्पनांची चमक तितक्या ताकदीनं उतरवता आली नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तरीही एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. गझल क़मर जलालवी यांची  "कभी कहा न किसीसे" छंद वेगळा [२४ मात्रा]

नाही कधीच कथिल्या गोष्टी तुझ्या कुणाला
कळली कशी न ठावे वार्ता उभ्या जगाला!

कित्येक पद्धतींनी घरट्यास बांधले मी,
बागेत वीज तरिही सोडे कधी न त्याला

तू मैफलीत परक्या जाणार नाहि, कळले
म्हणशील तर सजवितो या दीन कोटराला!

वर मागताच बहराचा, बाग अशी फुलली,
जागा जरा न उरली माझ्या इथे घराला

बागेत आज जा तू परि ध्यानि ठेव व्याधा,
सोडून एकटे मी आलो तिथे घराला

जळती पतंग माझ्या कबरीवरी फुका हे,
लावू नका दिवा हो, विनवीत आपणाला!

फिरवून पाठ जाती, देऊन मूठमाती,
अवधीत क्षणांच्या होई काय हे जगाला?

होईल यात कधिही उल्लेख तुझा आता,
तू सांग, कहाणी ती संपेल या क्षणाला

बदनाम व्हायची ना भीती तुला जराही?
भर चांदण्यात सखिला समजावया निघाला!

आणि ही मूळ गझल ::::::::

कभी कहा न किसी से तेरे फंसाने को
न जाने कैसे ख़बर हो गई जमाने को

चमन में बर्क़ नहीं छोडती किसी सूरत,
तरह तरह से बनाता हूं आशियाने को

सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे,
कहो तो आज सजा लूं ग़रीबखाने को

दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले,
कहीं जगह न रही मेरे आशियाने को

चमन में जाना तो सय्याद देखकर जाना,
अकेला छोडके आया हूं आशियाने को

मेरी लहड़ पे पतंगों का खून होता है,
हुजूर शम्मा न लाया करें जलाने को

दबा के कब्र में सब चल दिए, दुआ न सलाम,
जरासी देर में क्या हो गया ज़माने को?

अब आगे इसमें तुम्हारा भी नाम आएगा,
जो हुक्म हो तो यहीं छोड दूं फंसाने को!

क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!

4 comments:

  1. आशा भोसलेनी गायलेले शब्द असे आहेत : http://thaxi.hsc.usc.edu/rmim/giitaayan/cisb/3373.isb ; आशा आणि रूना लैला यांनी ही ग़ज़ल छान गायली आहे. मूळ गायिका मात्र नूर जहाँ आहे. तिच्या आवाज़ातल्या माझ्याज़वळच्या प्रतीत 'सुना है' हा शेर नाही. पण मुन्नी बेगमनी तो शेर गायला आहे आणि 'ग़ैर' शब्द वापरला आहे, 'ग़ैरों' नाही; आणि उर्ज़ुंग खान साहेबांनी आशाच्या तोंडी 'ग़ैर' शब्दच घातला आहे.

    > सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे, --- रचनाकारानीही 'ग़ैर' हाच शब्द वापरला असेल.


    दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले,
    कहीं जगह न रही मेरे आशियाने को
    --> मुन्नी बेग़म गाते : जगह न मिली, नूर जहान म्हणते 'जगह न रही', आणि आशाच्या तोंडी 'मिली' शब्द वरच्या दुव्यावर घातला आहे.

    ११-१२ सप्टेंबर १९९३ रोजी डॉ प्रकाश कामत यांनी पुण्यात आशा ८ तारखेला साठची झाली म्हणून कार्यक्रम केला होता. त्यात ही ग़ज़ल आशा आणि नूर जहाँच्या आवाज़ात झलक स्वरुपात वाज़वली होती.

    - डी एन

    ReplyDelete
  2. क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
    चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!
    ---

    मुन्नी बेग़म वर दिलेले शब्द गाते, तर नूर जहानचे शब्द आहेत : 'उन्हें बुलाने को'. पहिल्या ओळीतल्या 'तेरे फ़साने को' शी 'तुझ को' हा वापर ज़ुळतो, पण दोघीही 'तुम को ख़ौफ़-ए-रुसवाई' म्हणतात, 'तुझ को' नाही.

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. My comments are disappearing again and again; trying again...

    सडेकर बाई : माझी पहिली प्रतिक्रिया अचानक दिसेनाशी झाली आहे. तुम्हाला ती मिळाल्यास परत इथे टाका. थोडक्यात म्हणजे :
    > सुना है गैरों की महफिल में तुम न जाओगे
    >
    ही ओळ नूर जहाँ गायलेली नाही, मुन्नी बेगम 'ग़ैर' ('ग़ैरों' नाही) म्हणते. रूना लैला आणि आशाच्या आवाज़ातली ही ग़ज़ल या क्षणी माझ्याज़वळ नाही, पण आशाच्या तोण्डी 'ग़ैर' हाच शब्द दिसतो आहे. पहा - http://thaxi.hsc.usc.edu/rmim/giitaayan/cisb/3373.isb
    .
    .

    क़मर, जरा भी नहीं तुझको खौफ़-ए-रुसवाई,
    चले हो चांदनी शब में उन्हें मनाने को!
    ---
    मुन्नी बेग़म वर दिलेले शब्द गाते, तर नूर जहानचे शब्द आहेत : 'उन्हें बुलाने को'. पहिल्या ओळीतल्या 'तेरे फ़साने को' शी 'तुझ को' हा वापर ज़ुळतो, पण दोघीही 'तुम को ख़ौफ़-ए-रुसवाई' म्हणतात, 'तुझ को' नाही.

    - डी एन

    ReplyDelete