पुन्हा काल स्वप्नात आली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?
नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल
"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
खुले पापणी अन् उडाली गझल
कशी कोरडी मी, जरी वाहते
तुझ्या आठवांच्या पखाली गझल?
नसे वेगळे रूप माझे-तिचे,
मला वारशाने मिळाली गझल
"जरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
जुळे प्रेम एका कटाक्षामध्ये,
क्षणार्धात माझीच झाली गझल!
नको या प्रवासात थांबा कुठे,
सवे आज माझ्या निघाली गझल
हा वारसा गुरुदेव सुरेश भटांचा आहे, ही किती गौरवाची बाब आहे.
ReplyDeleteक्रांति,
ReplyDelete......... अतीशय सुंदर गझल.
तोडलंत, फोडलंत, चाबूक इ. इ. (अवधूत गुप्तेचे सर्व रिमार्क्स) ......... अतीशय सुंदर
कळतच नाही की ……
…. क्रांति गझलमय की, गझल क्रांतिमय झाली ?
खूप सुंदर ! खूप आवडली...
ReplyDeleteजरा एकटे वाटते, शब्द दे
तुझे सोबतीला" म्हणाली गझल
... अप्रतिम! ह्या ओळी खूप आवडल्या