Sunday, December 30, 2012

विरती संध्याकाळ

मी सूर नवे वेचून
ताल माळून
गुंफल्या गाठी
साधली मनापासून
हवीशी धून
बंदिशीसाठी

अर्थांची वळणे घेत
शब्दवाटेत
हरवली गाणी
फिरले त्यांच्या समवेत
अखेर कवेत
उदास विराणी

लय शोधित रानोमाळ
प्राण घायाळ
तरी मन गाते
मी विरती संध्याकाळ
मुके आभाळ
सोडुनी जाते 

2 comments:

  1. सुंदर आणि खोलवर जाणारी रचना

    ReplyDelete
  2. लय शोधित रानोमाळ
    प्राण घायाळ
    तरी मन गाते
    मी विरती संध्याकाळ
    मुके आभाळ
    सोडुनी जाते

    ____/\_____

    ReplyDelete