असा भन्नाट पाऊस, अशी गर्द हिरवाई
ओल्या मातीच्या गर्भात रुजलेली नवलाई
अशा भिजल्या क्षणांत, गर्द हिरव्या रानात
हाती गुंफुनिया हात कुठे दूरवर जावे
वाट सरली तरीही नवी वाट शोधताना
घन निबीड वनात धुंद पाऊस झेलीत
एकमेकांच्या मनात असे हरवून जावे
इन्द्रधनूच्या पिसांचे सप्तरंग लपेटून
कधी कौतुक पहात धरतीच्या अंकुराचे
हळुवार स्पर्शाने त्या सारे जग विसरावे
जागेपणी आठवून स्वप्नातल्या गुजगोष्टी
प्रीत मनात जागता, देही रोमांच फुलता
थेंब मिसळे मातीत, तसे एकरूप व्हावे
वाट सरली तरीही नवी वाट शोधताना !
ReplyDeleteवा ! मस्त ... एक अविश्रांत असं optimistic spirit ! किंवा असंच काहीतरी