पुन्हा एकवार कैफ़ी आज़मी यांच्या एका अपूर्व रचनेनं 'तहान' वाढवली. लालारुख चित्रपटात या गीताचे जे दोन भाग आहेत, त्यातल्या आशा भोसले यांच्या गंभीर भाव असलेल्या भागाचा अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. मला यातली हलकीफुलकी रचना मनापासून आवडत असली ऐकायला तरी अनुवादासाठी माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे गंभीर रचना घेतली आहे
ओझरत्या दर्शनाने उचंबळली तहान
रूप अपूर्व तुझे तू दाखवायलाच हवे
तेज उरे ना चंद्रात, फिकटल्या तारकाही
माझे जिणे उजळाया तुला यायलाच हवे
विरहात रात्र रात्र नित्य जागविसी मला,
जा, तुलाही दुराव्यात नीज येणारच नाही
तुझ्या पापणीमधून रोज झरेल सकाळ,
काळजात कळ सले, तशी सरेल निशाही
नाही इच्छा, ना अपेक्षा उरली न काही आस
प्रीतीवाचून न आता अन्य भावना मनात
माझ्या दुर्दैवाचे फेरे, त्यात त्रास या जगाचा
अदया रे, एवढीच तुझी कृपा जीवनात !
आणि ही मूळ रचना
प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखलाके
तुझको परदा रुख़-ए-रोशन से हटाना होगा
चांद में नूर न तारों में चमक बाकी है
ये अंधेरा मेरी दुनिया का मिटाना होगा
ऐ मुझे हिज्र की रातों में जगानेवाले
जा कभी नींद जुदाई में न आयेगी तुझे
सुबह टपकेगी तेरी आंख से आंसू बनकर
रात सीने की कसक बनके जगायेगी तुझे
कोई अरमां है, न हसरत है, न उम्मीदें हैं
अब मेरे दिल में मुहब्बत के सिवा कुछ भी नहीं
ये मुकद्दर की खराबी, ये जमाने का सितम
बेवफ़ा तेरी इनायत के सिवा कुछ भी नहीं
ओझरत्या दर्शनाने उचंबळली तहान
रूप अपूर्व तुझे तू दाखवायलाच हवे
तेज उरे ना चंद्रात, फिकटल्या तारकाही
माझे जिणे उजळाया तुला यायलाच हवे
विरहात रात्र रात्र नित्य जागविसी मला,
जा, तुलाही दुराव्यात नीज येणारच नाही
तुझ्या पापणीमधून रोज झरेल सकाळ,
काळजात कळ सले, तशी सरेल निशाही
नाही इच्छा, ना अपेक्षा उरली न काही आस
प्रीतीवाचून न आता अन्य भावना मनात
माझ्या दुर्दैवाचे फेरे, त्यात त्रास या जगाचा
अदया रे, एवढीच तुझी कृपा जीवनात !
आणि ही मूळ रचना
प्यास कुछ और भी भडका दी झलक दिखलाके
तुझको परदा रुख़-ए-रोशन से हटाना होगा
चांद में नूर न तारों में चमक बाकी है
ये अंधेरा मेरी दुनिया का मिटाना होगा
ऐ मुझे हिज्र की रातों में जगानेवाले
जा कभी नींद जुदाई में न आयेगी तुझे
सुबह टपकेगी तेरी आंख से आंसू बनकर
रात सीने की कसक बनके जगायेगी तुझे
कोई अरमां है, न हसरत है, न उम्मीदें हैं
अब मेरे दिल में मुहब्बत के सिवा कुछ भी नहीं
ये मुकद्दर की खराबी, ये जमाने का सितम
बेवफ़ा तेरी इनायत के सिवा कुछ भी नहीं
No comments:
Post a Comment