Monday, March 18, 2013

वळीव

डोळा भरून वळीव 
गळा आसवांची मिठी 
परागंदा पाखराच्या 
वाटेवर आर्त दिठी 

सुचे-रुचेना ग काही 
चित्त नाही थाऱ्यावर
कसं जडलं बिचारं
रानभरी वाऱ्यावर 

कुण्या वाटसराहाती 
कुण्या दिशेला धाडावा 
बोलघेवड्या मैनेचा 
मुका घायाळ सांगावा ?

सय सले काळजात 
सैरभैर होतो जीव 
आपसुक बरसतो 
ढगावाचून वळीव 

1 comment:

  1. सय सले काळजात
    सैरभैर होतो जीव
    आपसुक बरसतो
    ढगावाचून वळीव

    aah, sunder.

    ReplyDelete