Sunday, March 31, 2013

काही ओळी

आशय हरवुन अचेत झाल्या घुसमटलेल्या काही ओळी
बाड जुने उपसून निघाल्या भरकटलेल्या काही ओळी

पोकळ मथळे, शब्द फिकटसे 
जीर्ण चौकटी, चित्र पुसटसे
संदर्भांचे रंग उडाल्या, विस्कटलेल्या काही ओळी

निर्माल्यातिल गंधहीनता 
नीरस, निर्जिव तशा संहिता
उजळ असुनही निष्प्रभ झाल्या, धुरकटलेल्या काही ओळी

भावार्थावाचुन अडलेल्या
सुस्तावून लुळ्या पडलेल्या
नागिणीच कातेवर आल्या, सरपटलेल्या काही ओळी

No comments:

Post a Comment