Sunday, March 31, 2013

सावळ्या

फिकेसे, नकोसे जुने रंग झाले 
नवा, वेगळा रंग दे सावळ्या 
पुरे बाह्यरूपात पाषाणपूजा 
जरा अंतरातून ये सावळ्या 

तुझा गंध दे रे, तुझा रंग दे रे 
तुझा संग दे रे मना-जीवना 
तृषा वाढते या अभागी जिवाची
कृपेचे सुधापान दे सावळ्या

जडत्वास माझ्या मृदू रूप दे अन्
पिसासारखी दे हवेची गती
इथे देह लोपून जावो सुखाने
तुझ्यासंगती चित्त ने सावळ्या 

No comments:

Post a Comment